बिगो गाला अॅवॉर्डस २०२० संपन्न पुणे, : सिंगापूर येथील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी असलेल्या आणि बिगो लाईव्ह (लाईव्ह स्ट्रीमिंग),लाईक (शॉर्ट-फॉर्म व्हिडिओज) आणि इमो (व्हिडिओ कम्युनिकेशन) सारखे लोकप्रिय प्लॅटफॉर्मस असणाऱ्या बिगो टेक्नोलॉजी (बिगो) तर्फे सिंगापूरमधील ब्रॉडकास्टर्सकरिता बिगो गाला अॅवॉर्डस २०२० चे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच हा पुरस्कार समारंभ सिंगापूर येथील कॅपिटोल थिएटर येथे पार पडला असून इन्फोकॉम मिडिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (आयएमडीए) चे मुख्य उद्योग विकास अधिकारी हाऊ लाऊ प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.या पुरस्कार समारंभात टॉप रिजनल ब्रॉडकास्टर, टॉप रिजनल फॅमिली, टॉप ग्लोबल ब्रॉडकास्टर आणि टॉप ग्लोबल फॅमिली या श्रेणीतील ७० हून अधिक पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.यात भारतीय आशय निर्मात्यांना देखील टॉप रिजनल फॅमिली श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आले.
बिगो गाला अॅवॉर्डस २०२० संपन्न